कृषि उत्पन्न बाजार समिती, मालेगाव मध्ये आपले स्वागत आहे
बाजार समिती स्थापनेचा उद्देश
शेतकरी बांधवांच्या मालास योग्य बाजारभाव मिळावे, उत्पादक शेकऱ्यांचा माळ विकण्याची व्यवस्था उत्तम व चोख व्हावी व ती जवळपास असावी. वेगवेगळ्या मार्गाने होणारी आर्थिक फसवणूक व पिळवणूक होऊ नये व अनाधिकृतरित्यालूट इत्यादी प्रकार बंद व्हावेत, चोख वजनमाप होऊन मालाचा योग्य मोबदला रोख रूपाने त्याच्या पदरात पडावा. इतर संबंधित घटकांच्या हिताची सुद्धा जपवणूक व्हावी इत्यादी उद्देशांसाठी बाजार समितीची स्थापना करण्यात आली.
मालेगांव बाजार समितीचे मालेगावमुख्य बाजार व ४ उपबाजारातमालविक्रीसाठीयेणार्या शेतकरी बाधवांचे हित जोपासले जाईल व त्यांची फसवणूक होणार नाही यासाठी बाजार समितीची स्थापना सहकार कायद्यानुसार झालेली आहे. त्याचप्रमाणे व्यापारी व इतर बाजार घटक व सर्व बाजार घटकांचे हित विचारात घेवुनशेतमाल लिलाव, पेमेट, वजनमाप। मोजमाप वेळचेवेळीहोवुन कोणत्याही बाजार घटकांस अडचणी होऊ नये या करिता बाजार समिती कार्यरत आहे.