संस्थेची माहिती

शेती उत्पन्न बाजार समिती, मालेगाव

अ.क्र. मूलभूत माहिती तपशील
1 स्थापना 29/10/1948
2 विभाजणा नंतर 28/06/2012
3 इ-मेल am_malegaon@msamb.com
4 फोन क्रमांक 02554-253171
5 सभापतीचे नाव श्री.चंद्रकांत (आप्पा) धर्मा शेवाळे
6 सचिवाचे नाव श्री.कमलेशशांतीलाल पाटील
7 फोन न. मो. न. 9823875875
8 उद्धेश शेती उत्पादनाचा माल योग्य रीतीने विकला जावा, तो फसिवला जाऊ नये, तसेच खरेदीदाराला एकत्रित माल मिळून सरस निरास प्रतठरिवणे सोयीचे व्हावे, चांगल्या दर्जाचे शेतीमालाचे उत्पादन होण्यास उत्तेजन मिळावे हेतूने नियंत्रित बाजार क्षेत्र स्थापन करणेत आलेले आहे.
9 बाजारक्षेत्र
10 बाजार आवारे बाजार आवारे:-
कृषी उत्पन्न बाजार समिती, मालेगावचेस्वमालकीची मुख्य व उपबाजारआवारांसह एकूण १६.१६ हेक्टर एवढे क्षेत्र.
मुख्य बाजार आवार मालेगाव, क्षेत्र ९.८९ हे.

दुय्यम बाजार आवारे :-
  • मुंगसे (कांदा विभाग) क्षेत्र ०१ हे. ४६ आर.
  • झोडगे (कांदा विभाग) क्षेत्र ०३ हे. ३४ आर.
  • जळगाव नि. क्षेत्र १ हे. ४७ आर.
  • निमगाव
  • सौंदाणे खरेदी विक्री केंद्र

स्थापना -

मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समिती, मालेगांव जि. नाशिक ची स्थापना दि. २८/१०/१९४८ रोजी सहकार कायद्यातील तरतुदींना व नियमाला अनुसरून झालेली असुन बाजार समितीचे कामकाजास सुरुवात करण्यात आलेली आहे.

मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिनांक २८/०६/२०१२ रोजी विभाजन होवुन मालेगांव कृषी उत्पन बाजार समिती,मालेगावता.मालेगावजि.नाशिकव उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती, उमराणे ता. देवळा जि. नाशिक अशा नव्याने दोन बाजार समित्यांची स्थापना झालेली आहे.

उपबाजाराची स्थापना -

मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील व परिसरातील त्याचप्रमाणे बाहेरगावाहून शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकरी बांधवांची गैरसोय होवु नये यासाठी बाजार समितीने मुंगसे, झोडगे, निमगांव, जळगांव (निंः) याठिकाणी स्वतंत्र उपचाजार सुरु केलेले असुन त्याठिकाणी शेतमाल (कांदा। मका । इत्तर) विक्रीची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.

बाजार समितीचा उद्देश -

शेतकरी बांधवांच्या मालास योग्य बाजारभाव मिळावे, उत्पादक शेकऱ्यांचा माळ विकण्याची व्यवस्था उत्तम व चोख व्हावी व ती जवळपास असावी. वेगवेगळ्या मार्गाने होणारी आर्थिक फसवणूक व पिळवणूक होऊ नये व अनाधिकृतरित्यालूट इत्यादी प्रकार बंद व्हावेत, चोख वजनमाप होऊन मालाचा योग्य मोबदला रोख रूपाने त्याच्या पदरात पडावा. इतर संबंधित घटकांच्या हिताची सुद्धा जपवणूक व्हावी इत्यादी उद्देशांसाठी बाजार समितीची स्थापना करण्यात आली.

मालेगांव बाजार समितीचे मालेगावमुख्य बाजार व ४ उपबाजारातमालविक्रीसाठीयेणार्‍या शेतकरी बाधवांचे हित जोपासले जाईल व त्यांची फसवणूक होणार नाही यासाठी बाजार समितीची स्थापना सहकार कायद्यानु‌सार झालेली आहे. त्याचप्रमाणे व्यापारी व इतर बाजार घटक व सर्व बाजार घटकांचे हित विचारात घेवुनशेतमाल लिलाव, पेमेट, वजनमाप। मोजमाप वेळचेवेळीहोवुन कोणत्याही बाजार घटकांस अडचणी होऊ नये या करिता बाजार समिती कार्यरत आहे.

नियंत्रीत शेतमाल -

मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने सहकार कायदा व नियमातील तरतुदींना अनुसरून सर्व प्रकारचा शेतीमाल (अन्नधान्ये । कडधान्ये । मका । भु-शेंगा व इतर भुसार माल त्याच प्रमाणे भाजीपाला व फळे) नियंत्रीत केला असुन नियमनानुसार त्या शेतमालाचे लिलाव व मोजमाप व इतर कामकाज व्यवस्थितपणे व सुरळीतरित्या पार पाडली जातात.

स्वतंत्र भाजीपाला / फळे विभाग -

मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने नियंत्रीत शेतमालाबरोबर भाजीपाला व फळे यांचे नियमन केले आहे. मालेगांव तालुक्यातून व इतर पेठेतून भाजीपाला व फळे विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकरी बाधवांची भाजीपालाव फळे विक्रीची, लिलाव व इत्तर कामकाजाची सोय व्हावी यासाठी मालेगांव बाजार समितीने तिचे मालेगावमुख्य बाजार आवारात भाजीपाला व फळे विक्रीसाठी स्वतंत्र विभाग केले असुन सदर विभागात भाजीपाला व फळांचे लिलाव व इतर कामकाज / मोजमाप इ-व्यवस्थितपणे सुरु आहे.

शेतीमाल लिलावाच्या पद्धती -

आजमितीस महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विश्वासपात्र अशा बाजारपेठ असून त्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फादेशीर व उत्कृष्ट कामकाज करीत आहेत. स्पर्धात्मक युग असल्याने खरेदीदार बाजार आवारांवरयेऊन खुल्या पद्धतीने लिलावात भाग घेऊन मोठ्या प्रमाणावर शेतीमाल खरेदी करून व्यापार करीत आहेत. शेतीमाल खरेदी- विक्रीची प्रक्रिया हिशेतकऱ्यांच्या समोर कोणतीही फसवणूक होऊ नये या करता उघड लिलाव पद्धतीने स्पर्धायुक्त बोली बोलून उच्च बाजारभावाने शेतीमाल खरेदी केला जातो. बाजार समित्या शेतकरी हिताच्या असल्याने बाजार आवारावर शेतीमाल विक्रीस आलेनंतरशेतकऱ्यांना आवश्यक अशा सर्व सुविधा बाजार समितीमार्फतपुरविल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी आपला शेतीमाल विक्री करणेसाठी बाजार समित्यांना प्रथम पसंती देत असतो.

कृषी उत्पन्न बाजार समिती, मालेगाव, ता. मालेगाव, जि.नाशिकचे मुख्य व उपबाजारआवारांवर कांदा, मका, धान्य, भाजीपाला, जनावरे, या शेतीमालाचे लिलाव उघड पद्धतीने होत असतात. बाजार आवारावर कितीहीशेतीमालाची आवक असली तरी शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी आलेनंतरनंबर प्रमाणे त्यांच्या शेतीमालाचा लिलाव केला जातो त्यास आवारावर मुक्कामी थांबावे लागत नाही. बाजार समितीत शेतीमालाला योग्य बाजारभाव व शेतीमाल विक्री झालेनंतर २४ तासाच्या आत तात्काळ रोख पेमेंट दिले जाते. बाजार समितीने मुख्य व दुय्यम बाजार आवारावर शेतकरी, व्यापारी, आडते, कामगार यांचेसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शेतीमाल लिलावाच्या सुटसुटीत उघड लिलाव पद्धतीमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरीलशेतीमालमालेगावचे बाजार आवारावर विक्रीसाठी येत असून दररोज ५०० ते ६०० ट्रॅक्टर व ६०० ते ७०० जीपमधून साधारणतः १० ते १५ हजार क्विंटल कांदा व मका विक्रीस येतो .

बाजार समितीचे कामकाज -

मालेगावबाजार समितीत कांदा, मका धान्य व इतर शेतीमालशेतकऱ्यांचा विक्री झालेनंतर नियमाप्रमाणे २४ तासाच्या आत रोख पेमेंटअदा केले जाते. परंतु येथील व्यापारी तात्काळ विक्री झाल्यानंतर लगेचच पेमेंट देतात हि बाब अतिशय महत्वाची आहे. आजपावेतो बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्री झालेनंतर कोणत्याही शेतकऱ्यांचीपेमेंट बाबत फसवणूक झालेली नाही. खरेदीदाराकडून शेतकऱ्यांचे पैसे बुडविले जात नाही ही अभिमानाची गोष्ट आहे.

बाजार समितीचे मूळ उत्पन्न कांदा व मका या प्रमुख शेतीमालावरअवलंबून आहे. बाजार आवारावर येत असतात. सादर व्यापाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे रहिवासी पुरावे, ओळखपत्र अथवा त्त्यांचेकडे कोणती मालमत्ता आहे याचा काहीही एक पुरावा नसतो. सर्व शेतकरी बांधवांचे शेतीमालाचे पैसे देणेची जबाबदारी ही आडत्यांवर असते. संपूर्ण हंगामामध्ये अंदाजे १००० कोटी पर्यंत उलाढाल होते. संपूर्ण हंगामात व आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्यामका व कांदा या मालाचे एक रुपयासुद्धा बुडत नाही व बुडलेला नाही व अपवादात्मक परिस्थितीमध्ये पैसे राहिल्यास ते काढून देण्याची जबाबदारी बाजार समितीने पूर्ण केलेली आहे. पैसे बुडाल्याची कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार बाजार समितीकडे अथवा शासनाकडे नाही.

बाजार समिती अस्तित्वात नसल्यास -

बाजार समित्या अस्तित्वात नसल्यास खरेदीदार शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीमाल खरेदी करतील व तेथे स्पर्धा नसल्याने चालू बाजार भावापेक्षा ४० ते ५० रुपये कमी दराने शेतीमाल खरेदी करणेचेव्यापाऱ्यांचे धोरण राहील व अनेक शेतकऱ्यांचेपेमेंटथकवून मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झालेनंतरपरप्रांतीय व्यापारी/ खरेदीदार शेतकऱ्यांनाफसवून त्यांचे शेतीमाल विक्रीचे पेमेंटअदा न करता पळून जातील.

जसे द्राक्ष या शेतीमालाचे व्यवहार बाजार आवारावर होत नाही. परप्रांतीय व्यापारी परस्पर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन हे व्यवहार शेतकरी/ व्यापारी दोघांचे मध्यस्थीने होतात. त्या व्यवहारामध्ये अनेक शेतकरी बांधवांचे पैसे बुडालेले आहे. त्या बाबतीत अनेक वर्तमान पत्रात व पोलीस स्टेशनमध्येकेसेस दाखल झालेल्या आहेत व त्या पैशाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. त्यामुळे ते पैसे शासनाने किंवा कोणत्याही व्यक्तीने काढून दिलेले नसून बुडालेले आहे . याचे मुख्य कारण मध्यस्थी म्हणून कोणीही जबाबदार नाही म्हणून बाजार समितीचे नियंत्रण असणे अत्यंत महत्वाचे आहे.

तसेच सन २०१२ पासून मालेगावकृषी उत्पन्न बाजार समितीची नवीन स्थापना होऊन प्रत्यक्ष कामकाज दि.२८/६/२०१२ पासून सुरु झालेले असून आजमितीसकायमस्वरूपी व हंगामी कर्मचारी मिळून ५० ते १०० कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य बाजार समितीत काम करणेत गेलेले आहे. कर्मचाऱ्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह बाजार समितीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. बाजार समित्या नसल्यास कर्मचाऱ्यांचा नोकरीचा व त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्व्हचा प्रश्न गंभीर होऊन कर्मचाऱ्यांवरबेरोजगारीची परिस्थिती येऊनउपासमारीची वेळ येणार आहे.

तसेच बाजार समितीच्या बाजार आवारात शेतीमालाचेवजनमाप व हमालीचे कामकाज करणेसाठीहजारो कामगार आहेत. बाजार आवारावर शेतीमालाची आवक असल्यास कामगारांना काम उपलब्ध होते व त्यानुसार त्यांना पैसे मिळतात. परंतु शेतीमाल बाजार आवारावर विक्रीस न आल्यास हजारो कामगारांचे कुटूंब बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.

सोयी-सुविधा व बाजार समितीची वैशिष्ट्ये -

मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने तिचे मालेगीव मुख्य बाजार आवार व उपबाजार आवारात शेतकरी / व्यापारी। इतर बाजार घटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाची सोय करून दिलेली आहे. त्यामुळे मुख्य बाजार व उपबाजार आवारातील शेतमालाचे आवकेतदिवसेंदिवस वाढ होत आहे.

मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मालेगांव मुख्य बाजार व ४ उपबाजार आवारात शेतमालाचे विक्रीची रक्कम २४ तासात अदा करणेची तरतूद आहे. त्याप्रमाणे मालेगाव सुख्य बाजारासह उपबाजारात देखील शेतमालाच पेमेंट रोख अदा केले जात असल्याने बाजार आवारातील शेतमालाची आवकेत वाढ झालेली आहे.

(१) रोख पेमेंटची सोय - (व्यापारी बांधवांकडून शेतकयांचे पेंमेटसाठी)

(२) भाजीपाला व फळे यांचे लिलावासाठी स्वतंत्र विभाग

(३) मुंगसे । झाडगे । निमगांव | जळगाव (निः) येथे उपबाजाराची सोय

(४) शेतकरी । व्यापारी। बाजार घटकांसाठी आवश्यक सोयी- सुविधा

(५) सुल‌भ शौचालय, त्याचप्रमाणेपिण्याचे पाण्यासाठी वॉटर फिल्टर

(६) सौंदाणे येथे नवीन् शेतमाल खरेदी विक्री केंद्रा‌ची सोय

(७) धान्य चाळणी यंत्र व शेतमाल तारण ठेवणेसाठी गोडाउनची सोय

८) जनतेची सेवा करण्यासाठी दोन वैकुंठरथ मोफत दरात उपलब्ध करणारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव ही एकमेव बाजार समिती आहे.

९) शव पेटी

१०) ना नफा ना तोटा तत्वावर महा ई सेवा केंद्र (कृषि सेवा केंद्र योजना)

११) वाचनालय (शेती विषयक माहिती साठी पुस्तक संग्रह)

१२) शिवभोजन मुख्य बाजार आवारात

१३) शासनाचे आरोयग्यविषयक धोरण लक्षात घेऊन आवारामध्ये साचणाऱ्या खराब भाजीपाला व दुर्गंधी व पर्यायाने रोगराईचा फ़ैलाव होऊ नये म्हणून नाशवंत झालेला माल वाहतूक करून बाहेर टाकण्यासाठी ट्रॅक्टर खरेदी केलेले आहेत.

१४) संपुर्ण बाजार आवार सुरक्षेच्या दृष्टीने सी. सी. टीव्ही ची यंत्रणा बसविणेत आलेली असुन त्याद्वारे बाजार आवारात देखरेख ठेवली जाते

अनुज्ञप्तीधारक -

अनुज्ञप्ती प्रकार सन 2023-24 सन 2022-23 सन 2021-22
आडते 503 469 438
अ वर्ग १ व्यापारी 1210 1309 866
अ वर्ग २ व्यापारी 464 373 355
मापारी 71 72 69
हमाल 206 197 206
प्रोसेसर्स 13 13 12
मदतनीस 1 1 1
Top